'मरावे परी कीर्ती रूपे उरावे ' या उक्तीप्रमाणे तुमच्या हृदयस्थ व्यक्तींच्या स्मृतींना नव्यारुपात अजरामर ठेवण्याचा हा एक सोहळा. अनंतात विलीन झालेल्या आपल्या काही प्रिय व्यक्ती, अचानक आपल्यातून निघून जातात ज्यांची आपल्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी आपण कधीच भरून काढू शकत नाही. ज्यांच्या स्मृती आपल्या स्मृती पटलावर अखंड तेवत राहतात . अशा व्यक्तींचे आपल्यासोबत समाजालाही कधीच विस्मरण होऊ नये म्हणून, अनेक प्रकारे आपण त्यांना अजरामर ठेवण्याचा प्रयत्न करतो . त्यांच्या पुण्यतिथीला अनाथाश्रमात अन्नदान करणे, वृद्धाश्रमात देणगी देणे, मंदिरच्या जीर्णोद्धारासाठी मदत करणे, अशा अनेक मार्गाने आपण आपल्या कुवतीनुसार करीत असतो.
आपल्या प्रिय व्यक्तीचा नावलौकिक महाराष्ट्रभर असावा असे ज्यांना वाटते. त्यांच्यासाठी ग्लोबल स्कॉलर्स फौंडेशन सुरु करीत आहे राज्यस्तरीय "स्मृती भूषण पुरस्कार"
स्मृतीभूषण पुरस्काराचे स्वरूप
विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यथोचित सन्मान करण्यात येतो. पुरस्कार प्राप्त व्यक्तीची निवड ही निवड समितीतर्फे गुणवत्तेच्या आधारावर केली जाते. संपूर्ण महाराष्ट्रातून नामांकने मागविण्यात येतात. सर्व प्रकारची छाननी करून उमेदवाराचे नाव जाहीर केले जाते. जाहीर झालेल्या उमेदवाराला ११०००/- रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, पद्मश्री पुरस्कार प्राप्त व्यक्तीच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात येतो.
तुम्हाला ज्या प्रिय व्यक्तीच्या नावे पुरस्कार द्यायचा आहे. त्यांच्या नावाने संबंधित क्षेत्रातील व्यक्तींना तुम्ही पुरस्कार देऊ शकता .यासाठी कार्यक्रमाचे आयोजन, निवडसमिती, पद्मश्री पुरस्कृत पाहुणे, व्यासपीठ व्यवस्था, भोजन व्यवस्था या सर्व गोष्टींचे नियोजन संस्थेचे राहील.
यावर्षीच्या स्मृती भूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन १५ ऑगस्टच्या निमित्ताने १९ ऑगस्ट रोजी पुणे येथे पंचतारांकित हॉटेलमध्ये केले जाणार आहे .
स्मृतीभूषण पुरस्काराची वैशिष्ट्ये
* सदरचा पुरस्कार सोहळा राष्ट्रपती भवनात ज्या पद्धतीने पद्मश्री पुरस्कार सोहळा होतो त्याप्रकारे या सोहळ्याचे नियोजन असते .
* पद्मश्री पुरस्कार प्राप्त मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण.
* राज्यस्तरीय रेड कार्पेट समारंभ .
* महाराष्ट्रातून मोजक्याच लोकांची निवड.
* पुरस्कार्तींना रोख ११०००/-,स्मृतीचिन्ह व मानचिन्ह देऊन गौरव
* ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा पुरस्कार दिला जातो त्यांची राज्यस्तरावर ओळख .
* संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण.
* प्रत्येक पुरस्कर्तीचा व्यक्तिगत व्हिडीओ.
* सर्वांसाठी शाही चहापान व भोजन व्यवस्था.
* व्यासपीठावर पद्मश्री सोबत तुमच्याही हस्ते पुरस्काराचे वितरण.
स्मृतीभूषण पुरस्कार सहभागासाठी.
* प्रती पुरस्कारासाठी देणगीमूल्य आवश्यक.
* ज्यांच्या नावे पुरस्कार द्यायचा आहे त्यांची संपूर्ण माहिती.
* नोंदणीची अंतिम तारीख १५ जून २०२३.
* संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया.
* महाराष्ट्र राज्यासाठी मर्यादित.